मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाला आता वेगळं वळण लागलं आहे. या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि राज्य सरकारच्या भूमिकेबाबत गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांचे जे जुरी शिक्षण आहे त्यावर उद्या कोणी बाऊ करतील. उद्यो कोणी म्हणेल राजभवनातून कारभार चालला आहे का? मला त्यांना सांगायचं आहे, डंके की चोटवर कान उघडून ऐका, शरद पवार आणि अनिल परब की, राजभवनात सार्वभौम अधिकार असतात. जी ट्रायबलची असते. त्यामध्ये भारताच्या संविधानाने आणि न्यायायलाने सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे 36 आत्महत्या होताना त्यासंदर्भाने आता पर्यंत उद्धव ठाकरेंच्या नावे पत्र लिहूनही आत्महत्या झाल्या आहेत, असं गुनरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आदिवासींची होणारी हेळसांड आणि आत्महत्येचे प्रयत्न लक्षात घेता राज्यपालांनी त्यांच्या अधिकारातून रेफरन्स केला पाहिजे. हा विषय त्यांच्या अधिकारात आहे. आंध्रच्या धर्तीवर सर्व रेकॉर्ड राज्यपालांनी मागवावे. इतर प्रकरणात राज्यपाल सरकाकडे निवेदन पाठवतात. याप्रकरणात राज्यपालांना आपले संवैधानिक अधिकार वापरता येतील. त्यांनी ते वापरावेत अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. तसेच आदिवासींना एसटी शिवाय कोणतेही वाहन नाही. त्यामुळे राज्यपालांची जबाबदारी येते. त्यांनी याप्रकरणी ऑर्डर काढावी, अशी मागणीही सदावर्ते यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा’; गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

