मुंबई : कंगनाने एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्याचे समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केल्याने त्यांच्यावर देखील सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यातच आता मराठी निर्माते निलेश नवलाखा यांनी भविष्यात आता विक्रम गोखले यांच्यासोबत कामच करणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.
मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो. pic.twitter.com/ZqMrnX7zPc
— Nilesh Navalakha । निलेश नवलाखा (@nileshnavalakha) November 14, 2021
निलेश नवलाखा यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणावत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,’ नवलाखा म्हणाले आहे.
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
विक्रम गोखले म्हणाले होते की, कंगना जे म्हणाली ते खरं आहे, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या:
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- काही तरी द्या वाल्या लोकांची वेदना मी समजू शकतो; राऊतांचा फडणवीसांना टोला
- न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल; ‘या’ खेळाडूंसह ‘हिटमॅन’ उतरणार मैदानात!
- ‘मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते? ते काय कोविड न होणारं जॅकेट घालून येतात का?’
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

