Share

ठाकरे सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न; गोपीचंद पडळकरांचा आरोप

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाला आता वेगळं वळण लागलं आहे. या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि राज्य सरकारच्या भूमिकेबाबत गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार गोपीचंद पडळकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलकांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहत नाहीत. आतापर्यंत 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप चिघळत चालला आहे. सरकारही या संपाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या संपात हस्तक्षेप करून मार्ग काढा, अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

जवळपास 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काल खासगी गाडीतून जाताना 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपावर मार्ग काढण्याऐवजी सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांना निलंबनाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. सेवा समाप्तीच्या धमक्या दिल्या जात आहेत. भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. त्यामुळे कामगार भयभीत झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही आज राज्यपालांची भेट घेतली, असं पडळकर म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री आणि परिवहन सचिवांकडून माहिती घ्या. काय पद्धतीने काम चालू आहे याची सरकारकडे विचारणा करा. तसेच इतके दिवस संप सुरू असताना सरकार काय करत आहे याची माहिती घ्या, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!