मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, असं म्हणत कंगनाने अहिंसेची खिल्ली उडवली आहे. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. कंगनाच्या या वक्तव्याला आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलगी अनिता बोस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपण सुभाषचंद्र बोस यांच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही असं वाटत असल्याने त्यांचे आणि माझ्या वडिलांमधील संबंध फार गुंतागुंतीचे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे महात्मा गांधींचे प्रशंसक होते, असंही अनिता बोस यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी दोन्ही नेत्यांच्या संबंधांबाबत भाष्य केलं आहे.
दोघेही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मोठे नायक होते. एकाशिवाय दुसऱ्याला शक्य नव्हतं. काँग्रेसचे काही सदस्य गेल्या अनेक काळापासून अहिंसेमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करत असून तसं नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीचंही देशाच्या स्वातंत्र्यात योगदान आहे, असं अनिता बोस यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे फक्त नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल. गांधी नेताजींसोबत अनेकांसाठी प्रेरणादायी होते, असंही अनिता यांनी सांगितलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
- केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले…


