Share

सरकार कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा, सेवा समाप्तीच्या धमक्या देतंय- गोपीचंद पडळकर

Published On: 

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चिघळत असलेलं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात रोज वेगवेगळे वळण बघायला मिळत आहेत. अशातच एसटी महामंडळाकडून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या, २४ तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा कामावरून कामी करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीसा कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप थांबवण्यासाठी त्याच सोबत या संपातून मार्ग काढण्यासाठी या संपामध्ये फूट कशी पडेल. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण कसं निर्माण होईल. कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा देणं आणि सेवा समाप्तीच्या धमक्या देणं, असले प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आम्ही राज्याचे पालक म्हणून राज्यपालांना भेटलो, असं भाजपा नेते गोपिचंद पडळकर म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गोपीचंद पडळकर, सदभाऊ खोट व इतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विनंती केली आहे की, परिवहन मंत्री आणि परिवहन सचिव यांच्याकडून माहिती द्या. कशाप्रकारची आणि काय कामं चालू आहेत. यांची माहिती घ्या, इतके दिवस काम चालू असताना हे सरकार काय काम करत आहे, अशा प्रकारची मागणी केल्याचं गोपिचंद पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!