🕒 1 min read
औरंगाबाद : आज १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याने या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. आज आयोजित केलेल्या औरंगाबाद येथील सभेत अनेकांवर राज ठाकरेंनी जोरदार हल्ले चढवले.
यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. “मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही”.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. म्हणाले, शरद पवार सांगतात की, “मी दोन समाजात दुही माजवत आहे. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पण तुम्ही जातीत आणि धर्मात भेद निर्माण करत आहात. शरद पवार मला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. पण माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. पवार साहेब तुम्ही त्या पुस्तकांमधील तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी वाचल्या आहेत. माझ्या आजोबांनी जे लिहलंय ते व्यक्तीसापेक्ष आणि परिस्थितीला धरून लिहले आहे. ते हिंदू धर्माला मानत होते. पण धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवायचे”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
