मुंबई: आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी अनेक सवाल केले आहेत. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहे.
एका विशिष्ठ राजकीय पक्षाच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिले तर देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान आज किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेत मविआ नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही या वेफल्यातून आरोप केले जात आहेत. 58 कोटीचा घोटाळा झाला आहे. तो पैसा कुठे गेला? न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असली तरी त्या पट्टीला छिद्र पडलं आहे. त्यातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहत आहेत. तुम्ही किती हल्ले केले, फुसके बार केले तरी काही होणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला प्रश्न विचारले आहे. ते काय मुर्ख आहेत का? राजभवन सांगतं पैसे जमा झाले नाहीत. अजून कसला पुरावा हवा आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…नंतर येत आहे ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’”; संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
- IPL 2022 RR vs GT: अन् सामना सुरु असताना ‘या’ कारणामुळे हार्दिक मैदानाबाहेर पडला!
- किरीट सोमय्यांचा अजून एक घोटाळा बाहेर; संजय राऊतांनी केला खुलासा
- IPL 2022: राजस्थानविरुद्ध धुव्वादार खेळी केल्यानंतर हार्दिकचे मोठे विधान; म्हणाला “चौथ्या क्रमांकावर…”
- ‘जय भिम’ म्हणून बहुजनांना खूष करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’चा खुलासा करावा; अमोल मिटकरींचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

