🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आसल्याचं स्पष्ट झाले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहे. यानिमित्त ते आपल्या भाषण शैलीने सर्वांना प्रभावित करत आहेत. या सर्व प्रकरणाविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी ही शिवसेनेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्रात ते जनआशीर्वाद यात्रा काढत आहे. लाखोंच्या संख्येने त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळत आहे असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना राऊत यांनी ‘तरूण बाळासाहेब आम्ही पाहिले आहे. बाळासाहेब जेव्हा राज्यात फिरत होते तेव्हा असाच प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद त्यांना मिळत होता. जे वातावरण आता दिसत आहे तसे वातावरण बाळासाहेब राज्यात फिरताना होते असं सांगत आदित्य ठाकरे यांचे भरभरून कौतुकही केले.
दरम्यान, पक्षांतरावर भाष्य करताना त्यांनी ‘अनेक राजकीय नेते पक्ष सोडून जात आहेत यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पक्षांतरावर बोलणं टाळलं पाहिजे. कोण कुठल्या पक्षात जाईल हे आता सांगता येणे कठीण आहे त्यामुळे यावर कोणीही बोलू नये असंही विधान राऊत यांनी केले आहे.
- पक्षांतर केल्यानंतर देखील उमेदवारीची चिंता; आठवलेंनी सुचविला भन्नाट फॉर्म्युला
- दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी पायी चालत यात्रा काढेल- आदित्य ठाकरे
- आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या ! बीडवासियांनी आरक्षणा विरोधातचं काढला मूकमोर्चा
- न्यायालयाचा शंकरराव गडाखांना दिलासा, आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
