🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना उदयनराजेंना ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत असं विधान केले होते. पाटील यांच्या या विधानाला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मला प्रवेश करायचा असला तर मी पुढाकार घेईन असं विधान केले आहे.
याविषयी बोलताना उदयनराजे यांनी ‘कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, मी कधीही नकारात्मक विचार करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी कायम सकारात्मक विचार करतो असं विधान करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यामुळे उदयनराजे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.
पुढे बोलताना उदयनराजे यांनी ‘लोकांच्या कल्याणासाठी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतलाय. कोणत्या पक्षात जायचं की नाही ते नंतर पाहू. पण गेल्या एवढ्या वर्षापासून मी जेवढ्या योजना आणल्या, त्याला कुणीही साथ दिली नाही. मग अशा लोकांबरोबर कशाला रहायचं असं म्हणत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
- नारायण राणेंसाठी उद्धव ठाकरेंची समजूत काढू-चंद्रकांत पाटील
- … तोपर्यंत मंदी हटवणे अशक्य : पवार
- ‘उमेदवारी मिळाली नाही तरी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी मी कटीबद्ध’
- ‘शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
