🕒 1 min read
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीला मतदान न करणाऱ्या आमदारांना गद्दार म्हटलं आहे. शिवसेनेला मत न देणाऱ्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केले आहेत. दरम्यान संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊत यांना शिवसेनेच्या उमेदवाराला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे. तुम्ही सहा आमदारांवर गद्दारीचा आरोप कसा केला? आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे प्रश्न सोमय्या यांनी विचारले आहेत. “शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत?” असे सवाल त्यांनी आता उपस्थित केले आहेत.
“काही छोटे पक्ष आहेत जे आपले उमेदवार उभे करू शकत नाहीत ते कुणालाही मतदान करू शकतात. पण कुणी कुणाला मत दिले हे तुम्हाला कसं कळालं, किंवा निवडणूक आयोगाला तरी कसं कळालं? याचं उत्तर संजय राऊत यांना द्यावा लागणार आहे. याचा अर्थ शिवसेनेने आचारसंहितेचा आणि गोपनियतेचा भंग केला आहे.” असे आरोप यांनी केले आहेत. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची तक्रार दाखल केली पाहिजे, असे देखील सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?; सामना ‘रोखठोक’ मधून संजय राऊतांचा सवाल
- बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे का?; नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना टोला
- “आमचं नशीब चांगलं म्हणून ते…”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
- देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला
- आंद्रे रसेलनं खरेदी केली मर्सिडीज बेंझ एएमजी कार, ‘या’ गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
