🕒 1 min read
मुंबई: बहुप्रतीक्षित असलेली राज्यसभा निवडणूक अखेर पार पडली. बराच राजकीय गोंधळ, ड्रामानंतर याचा निकाल लागला. आणि निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. यात भाजपचे डॉ.अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार रिंगणात होते. संजय पवार वगळता महाविकास आघाडीचे उर्वरित तीन उमेदवार विजयी झाले. यावरच राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“संजय राऊत काठावर वाचले, अन्यथा काहीतरी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
तसेच आमदारांना निवडणुकीबाबत सर्व नियम मी बैठकीत समजावून सांगितले असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेच्या पराभवानंतर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांनी परावभ पचवावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
- देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला
- आंद्रे रसेलनं खरेदी केली मर्सिडीज बेंझ एएमजी कार, ‘या’ गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा VIDEO!
- IND vs SA 2022 : दुसऱ्या टी-२० सामन्याला मुख्यमंत्री नवीन पटनायक घंटी वाजवून करतील सुरुवात; वाचा!
- अपक्ष आमदारांना कोणता चारा दिला ; रुपाली पाटलांचा भाजपला सवाल
- आयपीएलमध्ये मिळालेले सर्व पैसे वडिलांना दिल्यानंतर तिलक वर्मा म्हणाला, ” मला यापासुन दूर राहू…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
