Share

देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्र राज्यसभेसाठी 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. यात  भाजपचे डॉ.अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार रिंगणात होते. संजय पवार वगळता महाविकास आघाडीचे उर्वरित तीन उमेदवार विजयी झाले. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“मध्ये कुठला तरी एक सर्व्हे केला होता त्यात देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. तेच लोकप्रिय आमदारांमध्ये अप्रिय कसे?असो आता महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक लढवणार का शेपूट घालणार?”, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. साधारणत: राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांना परावभ पचवावा लागला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!