मुंबई: पुण्यामध्ये लाल बत्ती भागात भाजपने आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडले. यावरूनच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
” अमृता फडणवीस आपण गायिकेतुन भाजपा प्रवक्ता कधीपासुन झालात? राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात थेट जनता करत नाही! जनतेचा कौल म्हणाल तर पदवीघर, शिक्षक ,देगलुर , कोल्हापुर या निवडणुकांत महाविकास आघाडी जिंकली हे लक्षात ठेवा. बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे का?”, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.
#शिवसेना मा.अमृता,गायिकेतुन भाजपा प्रवक्ता कधीपासुन झालात?
राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात थेट जनता करत नाही!
जनतेचा कौल म्हणाल तर
पदवीघर,शिक्षक,देगलुर,कोल्हापुर या निवडणुकांत @MaViAaghadi जिंकली हे लक्षात ठेवा.
बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे कां?@fadnavis_amruta— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) June 11, 2022
दरम्यान भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्या सध्या चर्चेत आहेत. याचे पडसाद भारतातच नव्हे तर जगात उमटून येत आहेत. यावरून भाजपला टार्गेट केले जात आहे. त्यात आताच महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय हालचाली होताना दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला
- आंद्रे रसेलनं खरेदी केली मर्सिडीज बेंझ एएमजी कार, ‘या’ गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा VIDEO!
- IND vs SA 2022 : दुसऱ्या टी-२० सामन्याला मुख्यमंत्री नवीन पटनायक घंटी वाजवून करतील सुरुवात; वाचा!
- अपक्ष आमदारांना कोणता चारा दिला ; रुपाली पाटलांचा भाजपला सवाल
- आयपीएलमध्ये मिळालेले सर्व पैसे वडिलांना दिल्यानंतर तिलक वर्मा म्हणाला, ” मला यापासुन दूर राहू…”


