Share

Uday Samant | वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा?, उदय सामंतानी सांगितला घटनाक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता–फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता – फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कंपनी गुजरात मध्ये गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर याच खापर फोडलं. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रातील उद्याेग गुजरातमध्ये गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राल धोके, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वेदांता–फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये गेल्याने आरोप- प्रत्यारोपांची मालिका आता राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये कोणामुळे गेला? यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प देखील दुसऱ्या राज्यात जातो का?, अस प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. RRPCAL या कंपनीने सरकारला शेवटचा अल्टिमेट दिला आहे. सरकारला एक महिन्यात रिफायनरी प्रकल्पावर निर्णय घ्यायचा आहे. या सर्व प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा?-

वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा? यावर उदय सामंत म्हणाले, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येण्याची सुरुवात ही जानेवारीमध्ये झाली. त्यापूर्वी एक वर्षाआधी तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगितलं होतं की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारचं नाही. त्यानंतर ७ महिने महाराष्ट्र सरकारकडे होते. त्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेज द्यायचे होते. इन्सेंटिव्ह पॅकेज हे हायपॉवर कमिटी झाल्याशिवाय आपल्याला फायनल करता येत नाही. ही हायपॉवर कमिटी १५ जुलैला झाली. ३८ हजार ८३१ कोटीचं पॅकेज कमिटीने मंजूर केले. त्यामुळे हा प्रकल्प कोणामुळे गेला मला आरोप करायचा नाही. मात्र माझा राजीनामा मागणाऱ्यांना सांगायचे आहे. ७ महिने हायपॉवर कमिटी का झाली नाही?, याचे उत्तर देखील मागावे. तसेच रिफायनरीला कोण विरोध करत आहे, याचे देखील जनतेला कळले पाहीजे.

महाराष्ट्रात काही गोष्टी ठरवून बोलल्या जात आहेत. स्वत:च्या कर्माचे दुसऱ्यावर खापर फोडायची प्रवृत्ती राज्यात सुरु आहे. ही प्रवृत्ती फार चुकीची असल्याचे उदय सामंत म्हणाले.

गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी-

वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये अर्धसंवाहक प्रकल्प आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. वेदांता या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माहितीसाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर मोठी रोजगार निर्मिती झाली असती, मात्र राजकीय नेत्यांच्या आळशीपणामुळे ही कंपनी गुजरातला नेण्यात आली. आता राजकीय नेते जरी एकमेकांवर टीका करत असले. तरी यात नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. त्यामुळे राज्यातील नागरीकांचे नुकसान राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सजक होण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!