Share

Narendra Modi | “त्या कंपनीला महाराष्ट्रातील सत्तांतराची कल्पना कशी असेल”, नरेंद्र मेदींचा एकनाथ शिंदेंना दिलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरून त्यांच्यामुळेच वेदांता फाॅक्सकाॅन हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला असल्याचं म्हटलं जातं आहे. यावरुन नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. यावेळी मोदी काय म्हणाले याची माहिती शिंदेंनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नरेंद्र मोदी काय म्हणालेः

महाराष्ट्रात मोठे उद्योग येणं गरजेचे आहे, त्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि आवश्यक पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. आम्ही त्यासाठी उद्योगांना आवश्यक त्या सवलती द्यायला तयार आहोत, असा मुद्दा मी मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडला. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी, यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, असं आश्वासन दिलं असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रात सत्ताबदल होईल, हे कंपीनाला कुठे माहिती असेलः

यादरम्यान, कंपनीची मानसिकता थोडी बदलली असेल. आपल्याला महाराष्ट्रात आवश्यक तसा पाठिंबा मिळणार नाही, असं कंपनीला वाटलं असेल. तसेच महाराष्ट्रात सरकार बदलेल याची कंपनीला तरी कल्पना कुठे असेल, असं मोदी म्हणाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, सर्वात महत्वाचा मानला जाणार हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!