Share

Ajit Pawar | “दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर दाखवू नका”

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार,असं वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितलं आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचे आभार देखील मानले आहेत. अशातच अनिल अग्रवाल यांनी केलेल्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर नका दाखवू, वेदांता प्रकल्पच आपल्या महाराष्ट्रात आणा, अशी मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मेन प्रकल्प जर दुसरीकडे जात असेल,तर संलग्न प्रकल्प हा एक पळवाट असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले की, माझं तर असं म्हणणं आहे की, हाही प्रकल्प इथे ठेवा आणि दुसराही प्रकल्प येऊ द्या. पुढे ते असंही म्हणाले की, जास्त मुलांना काम मिळाल्यावर बिघतं कुठं?. संलग्न प्रकल्पावर बोलताना ते म्हणाले की, आता ज्याठिकाणी पहिला प्रकल्प चालला आहे,त त्याठिकाणी सलग्न प्रकल्पाचा विचार करावा. आता पहिल्यांदा तो आपल्याकडे प्रकल्प व्हावा. ते संलग्न प्रकल्पाचा विचार करू, त्या काही अर्थ नसतो. त्यामुळे कोणताही प्रकल्प पहिल्यांदा होताना एक संधी असते आणि आपण त्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं, असं पवारांनी म्हटलं आहे.

त्यामध्ये सत्ताधाऱ्यांनीही राजकारण करू नये –

तसेच,अजित पवार यांना रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्र बाहेर जात असल्याचं विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, रिफायनरीचा प्रकल्पही महाराष्ट्रात यावा. ज्याच्यातुन महाराष्ट्र राज्याचं भलं होणारं आहे, ज्याच्यातून पर्यावरणाचा व्यवस्थितपणे विचार होणार आहे, असे जे काही प्रकल्प असतील ज्यातून राज्यातील तरूण-तरूणींना रोजगार मिळेल, अशा प्रकल्प राज्यात यावेत. यामध्ये आम्हीपण राजकारण करू नये आणि सत्ताधाऱ्यांनीही करू नये.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!