Share

‘फक्त महिला घरी असताना सीबीआयचे अधिकारी घरात कसं काय शिरले?’, सुप्रिया सुळे संतापल्या

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात काल बुधवारी रात्री अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. सीबीआयने २० मिनिटे चौकशी करून चतुर्वेदी यांना सोडून दिले. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतले. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळाले. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. केवळ महिला घरात असताना देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘यापूर्वी अशाप्रकारची दडपशाही मी पाहिलेले नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचं राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारं नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालायला हवा, ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही. पण आम्ही याच्याविरोधात पूर्ण ताकतीने लढू’, असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!