Share

 रस्ते अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारचा ”महत्वाचा” निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : भारत देशात दरवर्षी हजारो रस्ते अपघात होत असतात. हे रस्ते अपघात रोखायचे प्रयत्न भारत सरकार करत आहे. त्यातच आज केंद्र सरकारने रस्ते अपघातामध्ये मृत पावलेल्या लोकांच्या परिवारासाठी आणि रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन अपघातात पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई ही १२,५०० रुपये वाढवून  ५०,००० रुपयांपर्यंत केली आहे. याशिवाय जी लोक रस्ते अपघातात मृत झाली आहेत ; त्यांच्या परिवारातील लोकांसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाईची रक्कम वाढवून आता २ लाख रुपये केली आहे. हा नवीन नियम १ एप्रिल २०२२पासून देशभरात लागू होणार आहे.

भारत सरकारने अजून एका नियमात बदल केला आहे. त्यात अवजड वाहने आणि दुचाकी वाहने वाहून नेणाऱ्या ट्रेलरच्या क्षमीतेत वाढ केली आहे. आता ट्रेलरमध्ये जास्तीत जास्त तीन डेक ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वाहन वाहून नेण्याच्या क्षमतेत ४० ते ५० टक्क्याने वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२० पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे देशातील अपघातात मृत पावणाऱ्या लोकांच्या परिवारास मोठ्या प्रमाणात  मदत मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!