🕒 1 min read
सोलापूर: औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्या विधाना विरोधात आज सोलापूरात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू बद्दल बोलताना, गुरूंचा दाखला देताना, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली असून कोश्यारी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर निषेध व्यक्त केलाय. येत्या ४ मार्चला सोलापुरात राज्यपालांचा दौरा आहे, त्या दौऱ्याआधी राज्यपालांनी माफी मागण्याच आव्हान शिवसैनिकांनी केले आहे, आंदोलनानंतर सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू”, विनोद पाटलांचा इशारा
-
“राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका”, संयोगिताराजे यांची हात जोडून विनंती
-
“शरणागती पत्करणार नाही आणि आमची…”; रशियाशी चर्चेपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य
-
IPL 2022: मयंक अग्रवाल ‘पंजाब किंग्ज’ चा नवा कर्णधार म्हणून घोषित

