नागपूर: दोन वर्षांपासून विदर्भाच्या हक्काचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला पळवल्याच्या विरोधात आज नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. विदर्भावाद्यांनी सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते विधानभवन पर्यत मानवी साखळी तयार करून आपला रोष व्यक्त केला.
१ मे ला महाराष्ट्र दिनी राज्य शासनाच्या कार्यालयांवरील फलकांवर काळं फासून त्यावर विदर्भ लिहिणार असल्याचा इशारा माजी आमदार आणि विदर्भवादि नेते वामनराव चटप यांनी दिला आहे. अबकी बार विदर्भ सरकार,महाराष्ट्र सरकार विदर्भातून हद्दपार अश्या आशयाचे फलक घेऊन विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. विदर्भावर सातत्याने सुरू असलेल्या अन्यायामुळे केंद्र सरकारने तात्काळ स्वातंत्र्य विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
विदर्भाच्या हक्कचे अधिवेशन मुंबईला पाळवल्या नंतर एक स्पष्ट झाले आहे की त्यांच्या लेखी विदर्भाची इज्जत नाही,ते आमची इज्जत करत नसतील तर आम्ही महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Russia Ukraine war:रशिया युक्रेनशी युद्धबंदीचा करार करण्यास तयार : रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की
Maratha Reservation: संभाजीरजेंच्या डोळ्यात अश्रू; तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
भारतीय संघाचे आरामात मालिकाविजय मात्र सुनील गावस्करांना सतावतेय ‘या’ गोष्टीबाबत चिंता
भाजपच्या आमदाराला वादग्रस्त वक्तव्य भोवल ; निवडणूक आयोगाची कडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

