मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या दिलदार स्वभावामुळे ओळखले जातात. आपण राजकारण करत असलो तरी एका मर्यादेपलीकडे जाऊन टीका करणे अयोग्य आहे असे अजित पवार नेहमी म्हणतात. एखादी व्यक्ती संविधानिक पदावर असेल तर त्याची बडदास्त ठेवायलाच पाहिजे असे ठाम मत अजित पवार यांचे असते. याचीच प्रचिती आज पुन्हा अवघ्या महाराष्ट्राला आली.
‘’पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवलाच गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे.” असे म्हणत अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. आज पुणे शहरात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हे मत व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या विकासवादी धोरणाचं अजित पवार यांनी कौतुक केलं आहे. हे कौतुक करत असतानाच जे राजकारणी विकासाबद्दल बोलतात त्यांनाच सामान्य माणूस मतदान करतो अशीही पुष्टी त्यांनी मोदी यांचे कौतुक करताना जोडली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावरच देशाची सत्ता प्राप्त केली आहे. सामान्य लोकांना जो माणूस विकासाबद्दल बोलतो त्याच माणसाला मतदान करायला आवडते; फार कमी लोकांना वादाच्या मुद्द्यांमध्ये रस असतो असेही आज अजित पवार म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बद्दलच्या प्रश्नावर बोलत असताना अजित पवार म्हणाले कि किरीट सौमय्या जे बोलतात त्याकडे मी दुर्लक्ष करतो, मी फक्त विकासकामांवर लक्ष देणारा माणूस आहे. नरेंद्र मोदी पुणे शहराच्या दौऱ्यावर ६ मार्च रोजी येणार आहेत ; या मोदींच्या दौऱ्यात तुम्ही सहभागी होणार का असा प्रश्न देखील पत्रकारांनी आज अजित पवार यांना विचारला . तेव्हा अजित पवार यांनी पुन्हा विकासकामांच्या मुद्द्याचा पुनर्रउल्लेख केला.
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine war:रशिया युक्रेनशी युद्धबंदीचा करार करण्यास तयार : रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की
- भगतसिंग कोश्यारींविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक
- “महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं”, केंद्र सरकारला राऊतांचा खोचक टोला
- जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला- यशोमती ठाकूर
- “शरणागती पत्करणार नाही आणि आमची…”; रशियाशी चर्चेपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

