Share

विराट कोहलीने सुरु केली ‘१००’ व्या कसोटी सामन्यासाठी प्रॅक्टिस

Published On: 

मुंबई: टी २० मालिकेत विश्रंती घेतल्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली १००व्या कसोटी सामन्यासाठी नेट्सयामध्ये घाम गाळताना दिसत आहे. आपल्या कारकिर्दीत अजून एक बहुमान मिळवण्याच्या वाटेवर असलेल्या विराटने मोहाली मध्ये प्रॅक्टिस सुरु केले आहे. मात्र चाहत्यांमध्ये आनंदाच्या वेळीही निराशा आहे. कोरोनाचे प्रसार बघता कोहलीच्या श्रीलंका विरुद्ध भारत ऐतिहासिक कसोटी सामन्याला प्रेक्षकांची परवानगी नाकारण्यात आली आहे.

PCA ने विराट कोहलीच्या (virat kohli) मैलाचा दगड असलेल्या कसोटीसाठी स्टेडियमकडे जाण्याच्या मार्गावर होर्डिंग्ज लावले आहेत तरीही चाहत्यांना विराटला खेळताना पाहता येणार नाहीये. “कोरोना आणि हातात कमी वेळ असल्यामुळे सामना बंद दरवाजाआड प्रेक्षकांच्या विना आयोजित करण्याचे बीसीसीआयचे (BCCI) निर्देश होते. आम्ही आधी एक T20 आणि दुसरी कसोटी आयोजित करणार होतो, पण नंतर वेळापत्रक बदलले,” अशी माहिती पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सीईओ दीपक शर्मा यांनी दिली आहे.

गेल्या सहा महिन्यांत कोहलीच्या कारकिर्दीत बरेच काही घडले. UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकापर्यंत तो एकदिवसीय, T20 आणि कसोटी कर्णधार होता. नोव्हेंबरमध्ये संपलेल्या स्पर्धेनंतर तो टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्याचे एकदिवसीय कर्णधारपद काढण्यात आले आणि त्यानंतर यावर्षी त्याने कसोटीचे कर्णधारपद सोडले. दोन वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय शतक न झळकावणारा कोहली आपल्या १०० व्या कसोटीत मोहालीत अपेक्षित फलंदाजीच्या विकेटवर चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. ८,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी तोफक्त ३८ धावांनी कमी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!