Share

“शरणागती पत्करणार नाही आणि आमची…”; रशियाशी चर्चेपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर संपुर्ण जग चिंतेत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आले असतानाच रशिया युक्रेनवर  आपली पकड घट्ट करत आहेत. पाश्चिमात्य देशांच्या वाढत्या दबावानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाच्या आण्विक दलाला हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, युक्रेनने बेलारूसच्या सीमेवर रशियाशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, आम्ही शरणागती पत्करणार नाही आणि आमची एक इंचही जमीन सोडणार नाही, असे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी बेलारूस सीमेवर युद्धाच्या दरम्यान शांतता उपक्रमांबाबत चर्चा करणार आहेत, परंतु झेलेन्स्की म्हणाले की या चर्चेतून फारशी आशा नाही, तरीही ही संधी गमावू इच्छित नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, मी संरक्षण मंत्री आणि रशियन सशस्त्र दलाच्या प्रमुखांना रशियाच्या आण्विक प्रतिबंधक दलांना सतर्क करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांवर आपल्या देशाविरुद्ध प्रतिकूल पावले उचलल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!