नवी दिल्ली : स्टार अॅथलीट अविनाश साबळे याने शनिवारी राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक मिळवून दिले. अविनाशने 8:11.20 अशी वेळ घेत पदक जिंकले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट तसेच राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
केनियाच्या 26 वर्षीय अब्राहम किबिवोटने सुवर्णपदक जिंकले. त्याने 8:11.15 अशी वेळ नोंदवली तर केनियाच्या आमोस सेरेमने (8:16.83) कांस्यपदक मिळवले.
भारताचे हे चौथे पदक आहे-
बर्मिंगहॅम येथे जाहीर झालेल्या या खेळांमधील ट्रॅक आणि फील्डमधील भारताचे हे चौथे पदक आहे. याआधी प्रियांका गोस्वामी (10000 मीटर रेस वॉक, रौप्य), मुरली श्रीशंकर (लाँग जंपमध्ये रौप्य) आणि तेजस्वीन शंकर (उंच उडीत कांस्य) यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये पदके जिंकली आहेत.
Avinash Sable is a remarkable youngster. I am delighted he has won the Silver Medal in the men’s 3000m Steeplechase event. Sharing our recent interaction where he spoke about his association with the Army and how he overcame many obstacles. His life journey is very motivating. pic.twitter.com/50FbLInwSm
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2022
अविनाश साबळे भारतीय लष्करात कार्यरत आहे-
अविनाश हा भारतीय लष्करात कार्यरत आहे. सियाचीन, राजस्थान आणि सिक्कीम या ठीकाणी त्याने सेवा बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- 75th Independence Day | भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार ‘ही’ अमेरिकन गायिका
- Sunil Raut । मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात भाजपच्या मोहित कंबोज यांचा समावेश; सुनील राऊतांचा गंभीर आरोप
- Israel Palestine Conflict | इस्रायलचे गाझावर एअरस्ट्राईक तर हमासने इस्रायलवर डागले १०० रॉकेट; मोठ्या प्रमाणात जीवितहानी
- bachchu kadu । ‘मी तर बच्चू’, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही; मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या बच्चू कडूंची माघार
- Amruta Fadnavis | अमृता फडणवीस म्हणाल्या, गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल, ही पाटी शिंदेंच्या घराबाहेर लावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

