सांगली : “माणसाला झालेली विषबाधा, भूतबाधा याच्यावर उपाय करता येतो. मात्र यापेक्षाही भयंकर तीन बाधा हिंदुस्थानला झाल्या आहेत. म्लेंच्छ बाधा, आंग्लं बाधा आणि गांधी बाधा,” असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळाच्या प्रसंगी भिडे बोलत होते.
मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास ५० वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण सोहळ्याच्या वेळी तरुण-तरुणी युवावर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होता. देशाला शक्तीशाली करायचे असेल तर संपूर्ण हिंदुस्तानातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलून शिवाजी आणि संभाजी हा रक्तगट केला पाहिजे, असे सांगून संभाजी भिडे म्हणाले.
या माय भूमीच्या कपाळावरील हिंदुत्वाच्या स्वातंत्र्याचं कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा हिंदुस्थान जर घडवायचा असेल तर हे फक्त शिवाजी – संभाजी यांचे विचारच करू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचं या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता वाद विवाद होण्याची शक्यता आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर आता त्याचे पडसाद काय उमटतील, हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


