🕒 1 min read
Sambhaji Bhide | सांगली : संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वादात आहेत. “आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असं उत्तर त्यांनी एका महिला पत्रकाराला दिलं. हा वाद ताजा असतानाच ते आता एका नवीन वादात सापडले आहेत. इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती (Sudha Murthy) काल सांगलीमध्ये होत्या. तिथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) भेटले.
त्यावेळी या दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. त्यानंतर सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही युजर्सकडून सुधा मूर्ती यांच्यावर टीकाही होत आहे. व्हायरल व्हिडिओसंदर्भात कार्यक्रमाच्या आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. मेहता पब्लिकेशन हाऊसच्या एडिटोरिअल हेड आणि संवाद लेखकाशी कार्यक्रमाच्या निवेदक योजना यादव यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हट्टाला पेटले असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
नक्की काय म्हंटलंय पोस्टमध्ये?
“ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी 5 ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं. त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं. आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तस पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना त्यांना भेटू द्या. कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला.
https://twitter.com/sudhamurty/status/1589859650408960001?s=20&t=wE2ljzwWJ2XUQeh9n8NoGg
सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ‘ योजना, अग अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं. आणि सोडून द्यायचं.” अशा आशयाची पोस्ट करत आयोजकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil । “कुणाला पदरात घ्यायचे आणि कुणाची ओझी उचलायची हे भाजपने ठरवावे”
- Hostel Daze 3 | ‘हॉस्टेल डेज 3’ मध्ये शेवटच्या वेळी कॉमेडी करताना दिसणार राजू श्रीवास्तव, टीजर बघून चाहते झाले भावूक
- Jayant Patil | “अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत…” ; जयंत पाटील आक्रमक!
- Deepak Kesarkar | अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे – दिपक केसरकर
- Devendra Fadanvis | “सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार…”, सुळेंबाबत केलेल्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
