Share

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर मोहीत कंबोज यांचे ट्वीट! म्हणाले “Dawood Ibrahim के सभी गुर्गे…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: हनुमान चालीसा प्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठा खुलासा केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असून त्यांनी युसूफ लकडावालाकडून 80 लाखांचे कर्ज घेतले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्वीट करत एका वेगळ्या चर्चांना वाट करून दिली आहे.

मोहित कंबोज यांनी ट्वीटमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि युसूफ लकडावाला हाथमिळवणी करताना दिसून येत आहे. सोबतच बलराम जाखरही यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी नेमके कोणते आरोप केले?

‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, लकडावाला यांना 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणा यांच्या खात्यात आहे. मग ईडी राणाला चहा कधी देणार? या डी-गँगला का वाचवले जात आहे? भाजप गप्प का? तसेच तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावालाकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि डी गँगशीही त्याचे संबंध होते. ईडीने याची चौकशी केली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “लकडावालाने मनी लाँड्रिंग केले असून तो पैसा अनेक ठिकाणी फिरवला. याचाच एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. हे पैसे का आणि कशासाठी घेतले हा तपासाचा भाग असून एका गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला? याचा तपास मुंबईच्या आर्थिक शाखेने का केला नाही? याचा तपास करणे गरजेचे आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच लकडावाला अगोदर EOW कस्टडीत होता मग तो ईडीच्या ताब्यात गेला. मात्र याची चौकशी का झाली नाही? मविआ  नेत्यांची चौकशी करता मग याची का नाही? राणांना का वाचवंल जात आहे? तसेच या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का?, इतरवेळी पोपटासारखे बोलणारे आता गप्प बसलेत. विरोधी पक्षात इतके सोंगाडे भरलेत की, प्रत्येकावर एक स्वतंत्र सिनेमा निघेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!