Share

राणा आणि पोलिसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या भोंगा आणि हनुमान चालीसावरून जोरात राजकारण सुरु आहे. आज सकाळी नऊ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार होते. यानंतर मुंबईतील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळाले. आज कलानगर भागातील मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती तर राणा दाम्पत्यांच्या खारमधील घराबाहेर देखील शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा केली होती. शिवसैनिक आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष टिपेला पोहचला होता.

आता युवा सेनेने राणा दाम्पत्य यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीवरून राणा दाम्पत्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आता राणा यांच्या घरी दाखल झाले आहेत त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पार पडत आहे. परंतु राणा दाम्पत्य आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे, राणा यांनी वारंटची मागणी केली. पोलीस आणि राणा यांच्यात हाय वोल्टेज ड्रमा सुरु आहे.

आम्हाला जबरदस्ती इथून नेलं जात आहे. परंतु त्यांच्याकडे वॉरंट नाही. म्हणून राणा यांनी पोलिसांसोबत येण्यास नकार दिला आहे. तसेच आमच्याकडून ही गुन्हा नोंदवून घ्या, असे राणा म्हणाले. परतू आता राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!