Share

IPL 2022 KKR vs GT : रसेलच्या ५ धावांत ४ विकेट..! गुजरातचं कोलकात्याला १५७ धावांचं आव्हान; हार्दिकचं अर्धशतक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT) यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने कोलकाताला १५७ धावांचे आव्हान दिले आहे. २०व्या षटकात आंद्रे रसेलने ४ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवत गुजरातला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले.

गुजरातचा डाव

वृद्धिमान साहासोबत फलंदाजीला उतरलेल्या शुबमन गिलला गुजरातला चांगली सुरुवात करून देता आली नाही. कोलकात्याचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने शुबमनला (७) बाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्याने साहासोबत अर्धशतकी भागीदारी रचली. संयमी खेळणाऱ्या साहाला (२५) उमेश यादवने तंबूचा मार्ग दाखवला. हार्दिकने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. दुसऱ्या बाजूला गुजरातचे फलंदाज मोठे फटके खेळण्यास अपयशी ठरले. १७व्या षटकात हार्दिकला साऊदीने बाद केले. हार्दिकने ४ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. हार्दिक बाद झाल्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण मिळवत गुजरातला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले. राशिद खान (०), अभिनव मनोहर (२) स्वस्तात बाद झाले. आंद्रे रसेलने टाकलेल्या २०व्या षटकात गुजरातने ४ फलंदाजांना गमावले. २० षटकात गुजरातला बाद धावा करता आल्या. रसेलने ५ धावांत ४ बळी घेतले, तर साऊदीला ३ बळी मिळाले.

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कप्तान), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!