Share

जिम, मॉल्स होणार सुरु? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा

Published On: 

मुंबई: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्चमध्ये सरकारने लॉकडाऊन केले होते. तर जूनमध्ये काहीशी शिथिलता देत मर्यादित प्रमाणत टाळेबंदी उठवत अनलॉकची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला पुनःश्च हरिओम चा नारा मात्र बऱ्याच जिल्ह्यात फार काळ टिकू शकला नाही. तर आता खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जिम, मॉल्स सुरु करण्याबाबत खुलासा केला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. ते म्हणाले,  “महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाल आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.”

विधानभवनात कोरोनाचा शिरकाव; अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण

त्यामुळे गेले ३ महिने आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिम चालकांना व मॉल्समधील दुकान चालकांना काही दिलासादायक असे हे वृत्त आहे. कोरोना नंतर जे जे क्षेत्र सुरु करण्यात आले त्यामध्ये पूर्वीपेक्षा कित्येक पट बदल आता पाहावयास मिळत आहे. त्यामुळे, जिम, मॉल्स कधी चालू होणार?, त्याची अंमलबजावणी कोणकोणत्या जिल्ह्यात होणार?, नियमावली कशी असणार?, यासर्व बाबींची अजून कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. तर सद्या, राज्यातील बहुतांश जिल्हे हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेले आहेत.

‘त्या’ कंपन्या राज्याबाहेर गेल्याननंतर आता पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला दिला ‘हा’ सल्ला; उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना चाचणीवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्याचा आम्ही स्वागत करतो. आम्ही टेस्टिंग लॅबची संख्या वाढवत आहोत. तसेच अँटिजेन टेस्टही प्रत्येक जिल्ह्यात वाढवत आहोत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांच्या तुलनेत आपण सर्वाधिक टेस्ट करत आहोत. तसेच याबाबतची पूर्ण पद्धत पारदर्शी आहे,” असा टोला राजेश टोपे यांनी लगावला.

सेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांच्या कामाच्या फाईली अडवतात,कॉंग्रेसच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!