Share

Narendra Modi | “काँग्रेसने रामायणातून रावण आणला आहे”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

Published On: 

Narendra Modi | नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Malikkarjun Kharge) यांच्या रावणाच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील कलोल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावणाबाबत वक्तव्य करत मोदींवर टीका केली होती.

याला प्रत्युत्तर देत असताना, काँग्रेस पक्षाला रामसेतूचाही तिटकारा आहे. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचा अवमान करण्यासाठी कोण सर्वाधिक शिव्या देऊ शकेल, याबाबत स्पर्धा लागली आहे. मला शिवीगाळ करण्यासाठी रावणाला रामायणातून आणले. रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तसेच, जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल असं म्हणत, काही दिवसांपूर्वी एका काँग्रेस नेत्याने मोदी कुत्र्याप्रमाणे मरतील, असं म्हटलं होतं, तर दुसऱ्या नेत्याने मोदी हिटलरसारखे मरतील, असे म्हटले होते. कुणी रावण म्हणतो, तर कुणी झुरळं म्हणतात, असं देखील मोदी म्हणाले.

दरम्यान, गुजरातने मला जी ताकद दिली आहे, त्यामुळे काँग्रेस त्रस्त आहेत. या निवडणुकीत आम्ही मोदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असे काँग्रेसच्या एका नेत्याने येथे येऊन सांगितले. आणखी काही सांगण्याची गरज भासली असे म्हणून त्यांनी खर्गे यांना येथे पाठविलं असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!