मुंबई: कोरोनाच्या आर्थिक बोजातून उभारी घेण्यासाठी राज्य सरकारला आता परदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणे हे महत्वाचे आहे. मात्र, याच काळात २ बड्या कंपन्यांनी आपली गुंतवणूक महाराष्ट्रातून आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटक येथे हलवली आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनीच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व भविष्यातील गुंतवणूकींसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे.
“केंद्र सरकारनं १ एप्रिल रोजी देशात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या गुंतवणुकीकरीता इन्सेंटिव्ह योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत अॅपल फोन बनविणाऱ्या तैवानच्या काही कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे,” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
कोरोनामुळे नोबेल पुरस्कार सोहळा पण रद्द
केंद्राने ०१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूकीकरीता जाहीर केलेल्या #PLI योजनेअंतर्गत #Apple फोन बनविणाऱ्या तैवानच्या Contract Manufacturing कंपन्या भारतात गुंतवणूकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असे मी @OfficeofUT ला पत्र लिहीले आहे
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 22, 2020
तसेच त्यांनी ज्या दोन कंपन्या राज्याबाहेर गेल्या त्यांची देखील माहिती दिली आहे. “फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात ३५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असे जाहीर केले होते. पण ती तामिळनाडू आणि आंध्र मध्ये गेली. विस्ट्रॉन ही कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात अॅपलची एकही कंपनी नाही. आता Pegatron कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. तिला आपल्या राज्यांत आणले पाहिजे,” असंही ते म्हणाले.
आयुक्त तुकाराम मुंडेंचे कोरोनापासून बचावासाठी रामबाण उपाय!
फडणवीस सरकारने #Foxconn कंपनी पुण्याला ३५,००० कोटीची गुंतवणूक करणार असे जाहीर केले होते, पण ती तामीळनाडू व आंध्र मध्ये गेली. #Wistron कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात #Apple ची एकही कंपनी नाही. आता #Pegatron कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. तिला आपल्या राज्यांत आणले पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 22, 2020
त्यामुळे, राज्याबाहेर गेलेल्या कंपन्यांसोबतच भविष्यात भारतात गुंतवूणक करू ईच्छिणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणणे आवश्यक असल्याचे देखील सांगितले आहे. राज्यातील सद्यस्थिती बघता अनेक तरुण बेरोजगारीशी सामना करत आहेत, तर अनेक लघु व मध्यम उद्योग डबघाईला आले आहेत, त्यामुळे या कंपन्यांची गुंतवणूक हि महत्वाची असून महाराष्ट्राच्या आर्थिक चक्राला चालना देण्यास उपयुक्त ठरू शकतात.
कोरोना काळातील व्याजमाफीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

