Share

विधानभवनात कोरोनाचा शिरकाव; अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. आता कोरोनाचा शिरकाव विधानसभेमध्ये देखील झाला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण झाली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी होत असताना विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण झाल्याने अधिवेशनाच्या पूर्वतयारीला मोठा धक्का बसला आहे. स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्याची तयारी सुरू आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनाच्या 50% कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र विधानभवनातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

मला आवडलेले आदरणीय देवेंद्रजी…

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!