मुंबई-महाविकास आघाडीतील बेबनाव पून्हा समोर आला आहे. महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत, तसेच त्यांच्या महत्वपूर्ण कामाच्या फाईल्स अडवून ठेवत असल्याबद्दल चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याने आघाडीतील धुसफूस समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार धोटे यांनी ही तक्रार केली आहे.शिवसेना मंत्र्यांना समज द्यावी व कॉग्रेसच्या आमदारांचा सन्मान करावा अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार असाही प्रश्न आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.दरम्यान, धोटे यांनी जी व्यथा मांडली त्यावरून महाविकास आघाडीत कॉंग्रेसला जास्त महत्व दिले जात नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, अश्या प्रकारचे मतभेद समोर येण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वी महाविकास आघाडीतील अनेक कुरबुऱ्या समोर आल्या होत्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,नगरसेवकांची फोडाफोडी, निर्णय प्रक्रियेत समाविष्ट न केल्याचा आरोप, महाजॉब्स पोर्टल जाहिरात, अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती अशा विविध विषयांवरुन महाविकास आघाडीत मतभेद समोर आल्याचं पाहायला मिळालं आहे .
महत्वाच्या बातम्या-
IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?
शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड
गुड न्यूज : भारताच्या कॅडिला हेल्थकेअरनं केला कोविड – १९ वर लस बनवल्याचा दावा
रूग्णसंख्या दुप्पट झाल्याने धुळ्यात चार दिवस कठोर टाळेबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

