Share

Sanjay Raut | “मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर…”, संजय राऊत भडकले

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाची उपमा देत टीका केली होती. त्यावर काल नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत माझा नाही तर गुजरातचा अपमान झाल्याचं म्हटलं होतं. अशातच आता या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

यावेळी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर तोंडाचा रावण असल्याचं म्हंटलं होतं, त्यावर मोदींनी हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे असं म्हंटलं होतं. तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यावर महाराष्ट्राचा अवमान होत नाही का ?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संपूर्ण राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्यांचा निषेध ठिकठिकाणी केला जात असून राज्यपाल हटाव ही मोहिमही राज्यात सुरू झाली आहे. पुण्यात राज्यपाल यांच्या ताफ्याला राजकीय पक्षांसह संघटनांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील राऊत म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे, क्रांती केली म्हणताय तर वानती झाली काय ? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हेच का तुमचं प्रेम ? हीच का तुमची आस्था, असा घणाघात देखील राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!