🕒 1 min read
लासलगावः गेले काही दिवस महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांचं वादळ आलं आहे. यातच आता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. लासगावमध्ये एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशारा भाजपला दिला आहे. याचवेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आम्हीही पैलवान आहोत…
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती न करता शिवसेनेने निवडणूक लढली. केंद्र आणि महाराष्ट्र वगळता देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री असतानाही मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता. आता पुढचं टार्गेट मुंबई महानगरपालिका असल्याचे काल चंद्रकांत पाटील म्हणले होते. त्यांना प्रतिउत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले कि, मुंबई महानगरपालिकेसाठी चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी. तुम्हीही पैलवान आहात, आम्ही ही पैलावान आहोत.
पुढे बोलताना त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. 1982 मध्ये मी टपरीचालक होतो. मी एका शेतकरी कुटुंबातील असल्याने मी कधी आमदार होईल, असे स्वप्नही बघितले नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांनी ते स्वप्न पूर्ण केले, असा उल्लेख करत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवणही काढली. या भाषणा दरम्यान पाटील कधी भावुक तर कधी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
