मुंबई: सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं दिसत आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनवी आरोपांची टीकास्त्र डागत आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार असल्याचं वक्तव्यही काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलं होतं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनिल परब यांचा पुढचा नंबर असल्याचे सूचक विधान केले आहे.
याच पार्श्वभूमियार आज पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी पुढचा नंबर अनिल परबचा असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. सोमय्या ट्वीटमध्ये म्हणालेत की, “आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ३० मार्च रोजी सुनावणी होणार” या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“ती महिला नसून पुरुष आहे”; पुरुषाची पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव!
“मला फेअरवेल सामनाही खेळू दिला नाही” निवृत्तीनंतर श्रीशांतने जाहीर केली नाराजी
राखी बनली ‘गंगुबाई ’स्वॅग पाहून चाहते म्हणाले, ‘आलिया भट्टपेक्षाही….
“स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड”, प्रवीण चव्हाणांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

