मुंबई : अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय वाढला आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
मागच्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. काल शुक्रवारी मध्यरात्री सोलापूरसह पुणे, चाकण परिसरात पावसाने हजेरी लावली. आज मराठवाड्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण –
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –


