मुंबई : आज विधानसभेत शिंदे-फडणवीस यांच्या सरकारची बहुमत चाचणी होत असून, या सरकारने बहुमत सिद्ध करण्यात यश मिळवले आहे. विश्वासदर्शक ठरावात शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ मते मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ठराव जिंकला आहे. यानंतर अधिवेशनात बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.
भास्कर जाधव म्हणाले कि, संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं. संजय राठोड यांचं काय करणार आहात?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना ईडी चौकशी लावली, त्यांच्या घराखाली केंद्राची सुरक्षा लावावी लागली, हा नियतीचा न्याय आहे. तसेच आपण आज बाळासाहेब, दिघे, शिवसेनेचं नाव सांगताय, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला 40 शिलेदार उभे आहेत. दुसऱ्या बाजूला सामान्य शिवसैनिक छातीचा कोट करुन दुसऱ्या बाजूला उभा आहे, असंही ते म्हणाले.
तसेच कोण कुणाला धारातीर्थी पाडणार आहे, याचा विचार करा. ही जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल असंही भास्कर जाधव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

