पुणे – अहमदाबादमधील कालुपुरा रेल्वेस्थानक परिसरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात राज्य दहशतदवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून अटक केली. त्याला गुजरातला नेण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी मोहसीनने पुण्यात अनेक घरे बदलली होती. तसेच तो खूप कमी वेळा घराबाहेर पडायचा. घराजवळच असलेल्या मदरशामध्ये तो शिकवणी घ्यायचा. विशेष म्हणजे दहशतवादाचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानमध्येही जाऊन आला होता.
१९ फेब्रुवारी २००६ रोजी कालूपूर रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहसीन हा या प्रकरणी अटक झालेला तेरावा आरोपी आहे, तर १० आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
दरम्यान, तो वानवडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. ‘या कारवाईसाठी गुजरात एटीएसने पुणे पोलिसांकडे मदत मागितली होती. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती परिमंडळ-5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- अलर्ट! औरंगाबादेत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू, १७०२ नव्या कोरोनाबाधितांची भर
- जमिनीची सातबारामध्ये नोंद करण्यासाठी ३ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात
- मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा झांबड यांचा गौप्यस्फोट
- सर्व संशोधक विद्यार्थ्यांना ‘गाइड’ मिळणार! व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानला कोरोनाची लागन


