औरंगाबाद : सातबारामध्ये जमिनीची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या बथकाने बुधवारी दुपारी देवळाई तलाठी कार्यालयातून ताब्यात घेतले. भरत दत्तू दुतोंडे (३६, रा. म्हसोबानगर) असे या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराने वर्षभरापूर्वी देवळाई परिसरात जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, तलाठी भरत दुतोंडेने त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी केली. दुतोंडेने तक्रारदाराला कॉल करून आधी चार हजार रुपये मागितले. नंतर तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्यास सांगून बुधवारी कार्यालयात बोलावले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
याविषयी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप राजपूत, अंमलदार अरुण उगले, दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागूल यांच्या पथकाने बुधवारी दुतोंडेच्या कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून तीन हजार रुपये घेतल्यानंतर पंचाने इशारा करताच पथकाने कार्यालयात जात दुतोंडेला अटक केली. त्याच्याविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अलर्ट! औरंगाबादेत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू, १७०२ नव्या कोरोनाबाधितांची भर
- लॉकडाऊनचे नियम मोडणारे शहरातील तीन पेट्रोल पंप सील
- मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा झांबड यांचा गौप्यस्फोट
- ‘बाईपण भारी देवा’ केदार शिंदे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानला कोरोनाची लागन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

