Share

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानला कोरोनाची लागन

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसापासून कोरोना संसर्ग पुन्हा नव्याने डोके वर काढत आहे. कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका बॉलीवूडलाही बसला आहे. मागील काही दिवसात अभिनेता रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, आषिश विद्यार्थी आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती. आता या यादीत बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट अमिर खानचे नाव सामील झाले आहे.

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी कोरोनातून सावरत असताना अमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. अमिर खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यांनतर अमीर एका चित्रपटाच्या स्क्रिनींगला दिसला होता. यादरम्यान त्याने कोरोना चाचणी केली असता तो पॉझीटिव्ह आला. चाचणी पॉझीटिव्ह आल्यानंतर अमिरला त्याच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटूंबीयाकडून कळवण्यात आले आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिरच्या संपर्कात अलेल्या व्यक्तीनींदेखील कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन अमिरच्या टिमकडून करण्यात आले आहे. तसेच अमीरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी योग्य काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. अमिर खान नुकताच जागतीक जलदिनानिमित्त पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहभागी झाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!