Share

सर्व संशोधक विद्यार्थ्यांना ‘गाइड’ मिळणार! व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच म्हणजे ३ हजार ८२९ संशोधक विद्यार्थ्यांना गाइड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण १२ विषयपत्रिकेवर होते. मात्र या बैठकीत महत्त्वाच्या तीन विषयांवर सखोल चर्चा झाली. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांची उपस्थिती होती.

विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व गाइडबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेला व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत पूर्णविराम मिळाला. दोन पदव्युत्तर प्राध्यापक, महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि विद्यापीठ मान्यताप्राप्त संशोधन केंद्र असेल तरच संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना गाइडशिप देण्यात येईल, असा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला बैठकीत विरोध करून जाचक अटी लादून प्रश्न सुटणार नाही, संशोधक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पूर्वी ठरल्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना गाइड उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!