Share

मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा झांबड यांचा गौप्यस्फोट

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. तर आता अध्यक्ष पदाबाबत आपण चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी बुधवारी सांगितले.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, सतिष चव्हाण हे माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी विकास पॅनल बराेबर सामिल झाले हाेते. तर दरम्यान हरिभाऊ बागडे हे संचालक पदासाठी निवडून आले नाही. आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल उभे केले होते. या वेळी हरिभाऊ हे निवडणुन न आल्यामुळे शेतकरी विकास पॅनलच्या तंबूमध्ये नाराजी होती.

आणि मला विश्वासात न घेता सिवसेनेचे दोन मंत्री, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे आमदार सतिष चव्हाण हे भाजप पुरस्कृत गटामध्ये सहभागी झाले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये खुप उलथा – पालथ होणे हे देखील स्वाभाविक होते. परंतू हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडून या अगोदर मंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील हेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान आता काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच चंद्रकांत खैरे यांचे पॅनल आता काय निर्णय घेणार या वर सर्वच राजकीय तसेच विश्वेश्लक देखील राजकीय आखाडे बांधत होते.

आजच्या माजी आमदार सुभाष झांबड यांनी अध्यक्ष पदाबाबत चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जशी विधानसभा निवडणुकीनंतर एक झाली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले तसा बॉम्ब फोडणार का असाही अंदाज काही राजकीय विश्वेशकांनी व्यक्त केला आहे. आणि असे नाही झाले तर भाजप आणि शिवसेना हे देखील एकत्र येवून  निवडणून आलेले संचालकांची पळवापळवी करुन पुन्हा अध्यक्ष करते की काय अशी परिस्थिती देखील होवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!