मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या (sharad pawar) सिल्व्हर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माननीय शरद पवारजी यांच्या घरावरील हल्ला समर्थनीय नाही. निश्चितच निषेधार्ह आहे, परंतु सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना ओळखणे गरजेचे आहे. त्यांच्यावर आंदोलन करण्याची आलेली वेळ व त्यात गेलेले १०० पेक्षा अधिक बळी, या घटनेचे गांभीर्य सरकारने ओळखावे आणि एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी. सुडाची कारवाई करू नये.”, असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.
दरम्यान या घटनेवर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. अगोदर जल्लोष करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर आंदोलन का केले. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं कारण काय? असा प्रश्न उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका
“काय उपयोग ५० वर्ष राजकारणात असून लोकं घरावर चप्पल…”, निलेश राणेंचा शरद पवारांना टोला
“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत…”, निलेश राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

