Share

IPL 2022: सलग तीन सामने गमावल्यानंतर रोहितची पलटण विराटच्या रॉयल्सचा सामना करणार; मोठ्या बदलांची शक्यता!

Published On: 

मुंबई: १५वा हंगाम सुरू होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. यंदाच्या हंगामातील नवे संघ आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकत असतानाच, आयपीएलचे जुने यशस्वी संघ आपल्या कामगिरीने चाहत्यांना नाराज करताना दिसत आहेत. आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ या हंगामात फ्लॉप होताना दिसतोय. मुंबई या हंगामात अजून एकही सामना जिंकू शकली नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार सामना मुंबईसाठी महत्वाचा असणार आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB vs MI) मुंबई इंडियन्सला भिडणार आहे. अनुभवी कर्णधार रोहितच्या (rohit sharma) मुंबईची या हंगामातील कामगिरी सुमार राहिली आहे. ज्यामुळे आज बँगलोर विरुद्ध पलटनमध्ये मोठे बदल दिसू शकतात. तर दुसरीकडे बँगलोर बद्दल सांगायचे झाले तर नवकर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (Faf du plessis) नेतृत्वात संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

मुंबई आणि बँगलोर यांच्यातील हेड टु हेड कामगिरी बद्दल बोलायचे झाले तर झालेल्या ३१ सामन्यात मुंबईचे वर्चस्व राहिले आहे. मुंबईने सर्वाधिक १९ वेळा बँगलोरला परास्त केले. तर बँगलोरला १२ वेळा विजयाची संधी मिळाली. मात्र सध्याचे हंगाम आणि कामगिरी बघता आरसीबीचे पारडे जाड झालेले दिसते. मुंबईसाठी आजचा सामना महत्वाचा ठरणार आहे. पलटण आज पराभवाची मालिका तोडण्यासाठी मैदानावर उतरेल.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!