मुंबई : शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा घडली आहे. २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हि घटना खरंच कृषी प्रधान देशासाठी लाजिरवाणी आहे.
दरम्यान आता समाजातील सर्वच स्तरातून यावर रोष व्यक्त केला जात आहे. तर राज्यातील नेत्यांनी याच मुद्द्याला धरून महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आता भाष्य केले आहे.
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाहीये. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेले आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवी आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचं म्हणणे सरकारने ऐकावं,’ अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
तर पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत ठाकरे सरकावर निशाना साधला आहे.मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू झालेला आहे. महावसुली तीघडी सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलेय काय? शेतकरी बांधव धर्मा पाटलांच्या मृत्यूच्या किंकाळ्या कानात गुंजत असताना सुभाष जाधवाचा मृत्यू मंत्रालया बाहेर विष पिऊन होणं हे सारं वेदनादायी नाही का?
सत्तेच्या लोभापायी गरिब शेतकऱ्याची घर देशोधडीला लावणाऱ्या या महावसुली, मस्तलवाल, घराणेशाही असलेल्या सरकारचे डोके कधी ठिकान्यावर येणार ?सुभाष जाधव यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावत, त्याच्यावर अन्याय करणाऱ्या लाल फितीतील यंत्रणा व बेजबाबदार लोकप्रतिनीधीवर कारवाई कधी होणार ?’ असे संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला फेसबुकच्या माध्यमातून विचारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महावसुली तीघडी सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलेय? ; सरकारचे डोके कधी ठिकान्यावर येणार?’
- ‘उद्धव ठाकरे तुम्ही आता कायमचे मातोश्रीत बसा’; नारायण राणेंची टीका
- ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ! प्रशिक्षक जस्टिन लॅंगरविरुद्ध खेळांडूनी पुकारले बंड
- ‘भारतात मुस्लिमांना धोका नाही’; अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून केआरकेने व्यक्त केली चिंता
- अरे बाप्पा सिस्टर…….हळू!; रावसाहेब दानवेंवर काँग्रेसचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
