🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी हे सोडलेले ‘सांड’ असल्याची उपमा दानवे यांनी दिली होती. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यात आता प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडियावरुनही दानवे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यासाठी दानवे यांचा कोरोना लसीकरणाचा फोटो वापरत काँग्रेसने दानवे यांच्यावर टीका केली आहे.
या संदर्भात प्रदेश काँग्रेसच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेसने म्हटले की, ‘ज्या लोकांना साधी सुई देखील सहन होत नाही, ते देशासाठी छातीवर गोळ्या व बॉम्ब घेऊन अमर झालेल्या परिवारावर बोलतात… अरे बाप्पा सिस्टर…….हळू!’
ज्या लोकांना साधी सुई देखील सहन होत नाही,
ते देशासाठी छातीवर गोळ्या व बॉम्ब घेऊन अमर झालेल्या परिवारावर बोलतात…अरे बाप्पा सिस्टर…….हळू!
Appeal : #GetVaccinated pic.twitter.com/JK1MH8ehip
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 23, 2021
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेदरम्यान दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी त्याला प्रत्युत्तर देखील दिले होते. त्या नंतर प्रदेश काँग्रेसच्या वतीनेही दानवे यांच्या वक्तव्यावर त्यांना उत्तर देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संदर्भात खुलासा करतानाही दानवे यांनी राहुल गांधी यांना पुन्हा तशीच उपमा दिली होती. त्यामुळे हा वाद लवकर मिटण्याची शक्यता कमी दिसतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- संजना दानवे कन्नड मतदार संघाच्या भावी उमेदवार?
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
