🕒 1 min read
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरू आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचं चित्र दिसून येत आहे. तसेच, महिलांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण याविषयी देखील जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणीस्तानमधील मुद्यावरून अनेक बॉलीवूड कलाकारानी देखील संताप व्यक्त करत चिंता व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता केआरकेने अफगाणिस्तानमधून जे लोक स्थलांतर करत आहेत त्यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
Many Afghanistani Muslims are entering in India for their safety. So my this statement is proved 100% correct again. India is the best country for Muslims. pic.twitter.com/mgYipuReGL
— KRK (@kamaalrkhan) August 22, 2021
याबाबत केआरके म्हणतो की, सध्या त्या देशामध्ये जे काही चालले आहे ते गंभीर आहे. त्या देशातील मुस्लिमांची आपल्याला काळजी वाटते. भारत हा असा देश आहे की, जिथे मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित असलेला देश म्हणून आपल्याला भारताचे नाव घेता येईल, असे कमाल राशिद खान याने म्हंटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
