Share

‘उद्धव ठाकरे तुम्ही आता कायमचे मातोश्रीत बसा’; नारायण राणेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा ही चांगलीच वादळी ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केला असून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, शिवसेनेने देखील नारायण राणे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंबईतून सुरु झालेली राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही आता कोकणात पोहोचली आहे.

‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीला घरी बसलेले आहेत. आता त्यांनी कायमचे मातोश्रीत बसावं’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. ‘हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे,’ असा दावा देखील राणेंनी केलाय. यासोबतच, ‘शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो,’ अशी खिल्ली देखील नारायण राणे यांनी उडवली आहे.

‘१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा ?’

‘कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? कोरोना काळात मुख्यमंत्री 14 महिने मंत्रालयात आले नाहीत. मात्र तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता?’ असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. यासोबतच, ‘उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणाणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विकासाची अनेक कामे त्यांनी केली. त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे,’ असं भाष्य बावनकुळे यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!